सटाणा-देवळा रस्त्यावर अपघात;  पती पत्नी जागीच ठार

सटाणा-देवळा रस्त्यावर अपघात; पती पत्नी जागीच ठार

सटाणा | प्रतिनिधी Satana

सटाणा - देवळा रस्त्यावर Satana- Deola Road तुर्की हुडीजवळ सटाणा शहराकडून देवळ्याच्या दिशेने फरशी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन व समोरुन येणाऱ्या मोटरसायकलची धडक झाल्याने अपघातात मोटर सायकलवर स्वार संतोष गांगुर्डे व आशा गांगुर्डे Santosh Gangurde & Aasha Gangurde या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात टाळण्याच्या नादात पिकअप वाहन उलटल्यामुळे तीन जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

मयत मुळ चांदवड तालुक्यातील असून ते सध्यस्थितीत देवळा तालुक्यातील वाजगांव गावात राहात होते. सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पो.नि. सुभाष अनमूलवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com