
बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर Belgaon Kurhe
मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai Agra highway) दोन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हे फाट्यावर लक्झरी व अल्टोकारची जोरदार धडक झाली. या अपघातात लहांगेवाडी येथील पती पत्नी गंभीर झाल्याची घटना घडली....
अधिक माहिती अशी की, मुंबईकडून नाशिककडे जाणारी लक्झरी क्रमांक एम एच ९ सी वी ३६४५ या लक्झरीने वाडीवऱ्हे गावाकडे जाणाऱ्या अल्टो क्रमांक एम एच ०२ पी ए ५२८९ या वाहनाला जोरदार धडक दिली.
लहांगेवाडी येथील यशवंत एकनाथ लहांगे (वय ४५),योगीता यशवंत लहांगे(वय ३५) हे पती पत्नी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी तात्काळ नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तत्काळ उपचार मिळाल्यामुळे दाम्पत्य सुखरूप आहे.