देवळा- नाशिक रस्त्यावर अपघात; एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार

एक गंभीर जखमी
देवळा- नाशिक रस्त्यावर अपघात; एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार

देवळा | प्रतिनिधी Deola

देवळा -- नाशिक रस्त्यावर Deola- Nashik Road हॉटेल दुर्गा जवळ ईर्टीगा कार व मोटार सायकल यांच्यात आज सांयकाळी झालेल्या भीषण अपघातात Accident एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले.same family member were killed on the spot तर एक गंभीर जखमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील रामेश्वर येथिल रहिवाशी असलेले हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (४२), आपल्या कुटुंबासह पिंपळगाव (वा) येथून शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असतांना दुर्गा हॉटेल नजिक नाशिक कडून देवळ्याकडे येत असलेल्या इर्टीगा कार (क्रमांक एम.एच.४३--ए.एल--३००९) ने गोपिनाथ यांच्या मोटार सायकल (क्रमांक एम.एच - ४१ -के -५६६१) यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला .

अपघतात गोपिनाथ साळूबा हिरे(वय४२), यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपिनाथ हिरे (३५),मुलगा गोरख गोपिनाथ हिरे(१६) हे जागीच ठार झाले.तर मुलगी जागृती गोपिनाथ हिरे (१८) ही गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्या रात्री उशिरा देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल कृरण्याचे काम चालू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com