Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

देवळा | प्रतिनिधी | Deola

विंचूर-प्रकाशा महामार्गावर लोहणेर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर असलेल्या गतिरोधकाजवळ दोन एसटी बस व एक मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एक बस चालकसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोंडाईचा आगाराची बस (MH 14 BT 2180) सटाण्याच्या दिशेने जात असतांना लोहणेर गावाजवळील पेट्रोल पंप समोरील गतिरोधक जवळ हळू झाली. यावेळी मागून येणाऱ्या कांद्याच्या भरलेल्या ट्रकने (GJ 25 U 5141) मागून जोरदार धडक दिली.

यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने देवळ्याच्या दिशेने येत समोरून येणारी दुसऱ्या नंदुरबार-नाशिक (MH 20 BL 4039) या बसला धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले असून, ट्रक जवळील शेतात उलटला आहे.

Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी
APMC Election 2023 : मतदान संपलं, 'या' बाजार समित्यांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात; आता लक्ष निकालाकडे

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक समीर बारावकर, उप निरीक्षक रमेश पाटील, सहा.पो. उप. निरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सचिन भामरे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी
बारसूमध्ये जोरदार राडा! पोलिसांकडून लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर

पोलिसांनी घटनास्थळावर पोहचताच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com