विंचूरप्रकाशा महामार्गावर अपघात;  दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक

विंचूरप्रकाशा महामार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Hemant Shukla

लोहोणेर | प्रतिनिधी

लोहोणेर येथे नातलगाकडे सलून व्यवसाय करीत असलेल्या युवकाचा दसवेल गावाजवळ अपघातील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नरेंद्र शिवराम हिरे असे या युवकाचे नाव आहे. दसवेल गावाजवळ राजापूर फाट्या नजीक खडीने भरलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाल्याने हिरे यांचा या घटनेत मृत्यू झाला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील मूळचा रहिवाशी असलेला नरेंद्र शिवराम हिरे ( वय ३५ ) हा युवक लोहोणेर येथे आपल्या नातलगाकडे सलून व्यवसाय करीत होता.

गुरुवारी सकाळी तो आपल्या मित्रा समवेत दुचाकीने ( एम. एच. ४१ जे. ३२४० ) ने आपल्या गावी देशशिरवाडे येथे जात असताना सकाळी साडे अकराच्या दरम्यान दसवेल गावानजीक राजापूर फाट्या जवळ असलेल्या वीटभट्टी नजीक खडीने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नरेंद्र शिवराम हिरे हा जागीच ठार झाला.

तर त्याचा मित्र दिनेश पवार यांच्या पाठीला व कमरेला मार लागला. नामपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी लोहोणेर येथे मयत नरेंद्र हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. या अपघातात ठार झालेल्या नरेंद्र हिरे याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीण, मेव्हणे असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com