बांधकाम व्यवसायाला गती

मालमत्ता खरेदी-विक्रीतून 789.12 कोटी महसूल
बांधकाम व्यवसायाला गती

सातपूर । प्रतिनिधी Satpur

लॉकडाऊन Lockdown उठवल्यानंतर जानेवारीपासून खरेदी व्यवहार दस्त नोंदणीप्रक्रिया गतिमान झाली होती. गेल्या वर्षभरात नोंदणीप्रक्रिया गतिमान झाली असून वर्षभरात सुमारे 1 लाख 32 हजार 155 मालमत्ताच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या नोंदणीत 789.12 कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा झाला आहे.

मागील वर्षी बांधकाम व्यवसायाला Construction Business गती देण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली होती. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मार्चमध्ये अनेक नागरिकांनी चलनाचा भरणा केल्याने घरांच्या नोंदणीला कर सवलतीचा बूस्टर मिळाल्याचे दिसून आले. करोनामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर नागरिकांमध्ये घर घेण्याचा कल वाढू लागला. शासनाने त्यात मुद्रांक सवलत दिल्याने मंदीतून उजळण्यास ही सवलत लाभदायी ठरली. या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करून घेतली होती. मात्र शासनाने मार्च अखेरपर्यंत सवलत ठेवल्यानंतर काही अंशाने व्यवहार ठप्प झाले होते. मात्र 5 महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ग्रुप प्रकल्पांचे व्यवहार यांनी पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे दिसून आले. या महिन्यांमध्ये नोंदणी या अतिशय गतिमान पद्धतीने झाल्याचे चित्र आहे. करोनाचे संकट असतानाही गेल्या आर्थिक वर्षात नाशिकमध्ये जवळपास 1 लाख 32 हजार 155 मालमत्ताच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. या माध्यमातून 789.12 कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा झाला आहे. यात सर्वाधिक वसुली मार्च 2021मध्ये 201 कोटी 77 लाख एवढी झाली आहे. या व्यवहारांना गती येण्याचा आणखी एक गोष्ट कारणीभूत होती ती म्हणजे गृह कर्जात देण्यात आलेली सवलत ही होय. विविध बँकांनी त्याचे कर्जावरील व्याजदर कमी केल्याने ग्राहकांना स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी घर घरेदीचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. दरम्यान इंधन दरवाढ व स्टील सिमेंटचे दर वाढलेले असताना बँकानी व्याजदरात कपात केल्यामुळे ग्राहकांना स्वस्त गृहकर्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांची , घर घेण्याची क्षमता देखील वाढली आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यामुळे घराच्या किमती वाढलेले असतानाही घराची विक्री वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com