यंदाही कसमादेमध्ये अर्ली द्राक्षांची रेलचेल

यंदाही कसमादेमध्ये अर्ली द्राक्षांची रेलचेल

पिंगळवाडे | Pingalwade

नाशिक जिल्हा (Nashik District) हा द्राक्ष पंढरी म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यात बागलाण आणि कसमादे अर्ली द्राक्षांसाठी विशेष मानले जातात. या अर्ली द्राक्षाची छाटणी बहुतांश शेतकरी जुलैअखेर किंवा ऑगस्टचा प्रथम आठवड्यात करतात. आता अर्ली द्राक्षांच्या कामांना वेग आला आहे...

अर्ली द्राक्ष पिक तसे फार कष्टाचे व आर्थिक खर्चाचे आहे. याला साधारण एकरी दोन ते तीन लाख रुपये खर्च सुरुवातीपासून शेवटपर्यंत येत असतो. त्यात महागडी रासायनिक खते, औषधे शेतकऱ्यांना वापरावे लागतात.

जर वातावरणाने साथ दिली तर बऱ्यापैकी पैसा शेतकऱ्यांना या आर्ली द्राक्षामधून घेता येतो. परंतु यावर्षीच्या पावसामुळे आणि द्राक्ष येतील अशी शक्यता नाही. मजुरांची कमतरता भासू नये याकरिता शेतकरी पेठ, सुरगाणा या भागातून द्राक्षाच्या कामासाठी मजूर मोठ्या प्रमाणात आणतात.

या मजुरांकडून द्राक्ष बागांमध्ये गोड छाटणी ते शेवट माल निघेपर्यंत कामे केले जातात. या मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य असा मोबदलाही देण्यात येतो. त्यामुळे मजूर वर्गही आनंदाने आपले काम करतात.

यंदा कदाचीत आमच्या द्राक्षा बागा खराब हवामानामुळे वाया गेल्या तर आम्हाला शासनाकडून योग्य असे सहकार्य अपेक्षित आहे. पिक विमाच्या माध्यमातून आम्हास मदत जाहीर करावी. तसेच बहुतेक व्यापारी द्राक्ष माल व पैसे घेऊन पळून जातात, अशा व्यापाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा वचप असला पाहिजे. रासायनिक खते आणि औषधांच्या किमती थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या पाहिजे. जेणेकरून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com