शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला वेग

शिवसेनेच्या मोर्चेबांधणीला वेग

नाशिक । रवींद्र केडिया Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिकात एकत्रित निवडणुका लढल्यानंतर स्वबळाचा नारा देण्यात आला होता. मात्र त्यामुळे शिवसेनेचे Shivsena संख्यबळ तुलनेत घटले असले तरी विरोधी पक्ष म्हणून गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने आपल्या स्वभावगुणा प्रमाणेच आक्रमक भूमिका घेत सभागृह विविध प्रश्नांवरुन दणाणून सोडले होते. मात्र येत्या निवडणूकीत नव्यां येणाऱ्या इच्छूकांसोबतच जून्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे नवे आव्हान उभे ठाकणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या NMC Upcoming Elections तयारीत शिवसेना Shivsena अग्रेसर झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने शहरातील मोर्चेबांधणीला गती दिलेली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा धडाका लावलेला आहे.प्रत्यक्षात शिवसेना प्रमुखांच्या दृष्टीकोनाप्रमाणे युवावर्गही शिवसेनेची ताकद म्हणून ओळख होती. त्या युवा वर्गाला संघटीत करण्याचे काम शिवसेनेने प्रामुख्यानेे हाती घेतलेले आहे. त्यामुळे शिवसेना पून्हा आपले आक्रमक रुप धारण करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे.

प्रत्येक निवडणुकीचा निकाल हा महिलांचा संघटीत सहभागावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. या सूत्रावर लक्ष केंद्रीत करुन शिवसनेने महिलांची विशेष टीम तयार केली आहे. प्रभागनिहाय मोर्चेबांधणीतही त्यांनी मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडे पक्षांतरातून ‘इन-कमिंग’ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पक्ष ताकद वाढत आहे. यामुळे शिवसेनेची जादू यंदाच्या निवडणूकीत चालणार काय? यावर राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसून येत आहे.

शिवसेना हा नाशिकच्या मातीतला पक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसैनिकांचा मोठा फौज फाटा आजही सूप्तावस्तेत दिसून येतो. या पूर्वीच्या निवडणूकांचा इतिहास पाहिल्यास शिवसेनेने लोकसभा अथवा विधान सभांच्या निवडणूकांमध्ये पराभव पत्करण्याचे कारण मतदार नसून स्वकियांनीच केलेली बंडखोरी हे कारण होते. शिवसेनेमध्ये गेल्या काही वर्षात गटातटाचे राजकारण वेगाने वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून तटस्थ राहणे पसंत करीत होता.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या तटस्थ शिवसैनिकांची मोट बांधण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करित ्रआहेत. त्यासोबतच येणार्यांच्या गर्दीमुळे मूळ कार्यकर्ते काही अंशाने नाराज होत असल्याचे दिसून येत आहे. काही बैठकांमध्ये तसे पडसादही उमटले होते. त्यामुळे शिवसेनेला असलेल्या कार्यकर्त्यांचे जाळे टिकवण्यासोबतच नव्या येणार्या उमेदवारांची जोड बांधणी करताना मोठी दमछाक होणार असल्याचे चित्र आज तरी दिसून येत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने तिकीट नाकारल्याने पक्षांतर्गत नाराजीचा होणारा विस्फोट रोखण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी आजच तयारी करणे गरजेचे आहे. अनेक वेळा गटबाजीच्या माध्यमातून उमेदवारांना ‘रन’ करण्याचे प्रकार होत असतात. त्यातून भविष्यात पक्षांतर्गत बंडाळीला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भविष्यातली संभाव्य संकटे असली तरी आज राजकीय मंचावर शिवसेनेचे महिला आघाडी, वॉर्डनिहाय संघटन बांधणी, बूथ कार्यकर्ते, बाहेर गेलेल्या नाराज शिवसैनिकांना स्वगृही परत आणणे या राजकीय घडामोडीतून मुसंडी मारत प्रचार सुरू होण्यापूर्वीच योग्य पध्दतीने पक्ष बांधणी केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com