एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भामरे सेवानिवृत्त

एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भामरे सेवानिवृत्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Department) पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Reader Satish Bhamre) यांची पोलीस खात्यातील ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती (Retirement) निमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक वाचक सतीश भामरे हे मुळचे सटाणा तालुक्यातील (satana taluka) फोपीर या गावातून १९९२ साली उपनिरीक्षक (Sub-Inspector) या पदावर पोलीस खात्यात रुजू झाले.

मुंबई (mumbai) व ठाणे (thane) येथे त्यांनी तब्बल १६ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सीआयडी नाशिक (CID Nashik), लाचलुपत विभाग औरंगाबाद (Corruption Department Aurangabad) व लाचलुचपत नाशिक विभागातून ते सेवानिवृत्त झाले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक (nashik) येथील कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी यांच्यासह भामरे यांच्या पत्नी जया भामरे मुलगा ओम भामरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com