सुरगाण्यात तीन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

सुरगाण्यात तीन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

सुरगाणा | Surgana

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सुरगाणा (Surgana) या आदिवासी भागात कारवाई केली आहे. या कारवाईत पंचायत समितीचे बचत गट कर्ज वितरण विभागातील दोन समन्वयकासह एकाला १० हजारांची लाच (Bribe) स्विकारताना रंगेहाथ पकडले....

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पंचायत समितीच्या आवारात एकच चर्चा रंगली होती. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २/११/२०२२ रोजी दीड वाजेच्या सुमारास स्वयंरोजगार उभारणी करीता तालुक्यातील बचतगटांना गट निधी, कर्ज वितरण, पतपुरवठा करणे कामी पंचायत समितीच्या संबंधित विभागातील कर्मचारी प्रमोद बाळासाहेब पाटोळे (३७) तालुका अभियान व्यवस्थापक कंत्राटी कामगार रा. बोरगाव, विलास मोतीराम खटके (३८) प्रभाग समन्वयक हट्टी, यादव मोतीराम गांगुर्डे (३०). खाजगी इसम रा. चिंचपाडा यांना रंगेहाथ पकडले आहे.

नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार उमेद अभियानअंतर्गत गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाचे मानधन देण्याकामी १० हजारांची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

सुरगाण्यात तीन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
'पुण्याहून पुणतांबा'! स्पाईस जेट विमानसेवेचा अजब कारभार; वाचा सविस्तर

एसीबीने सापळा रचून पवार अमृततुल्य या चहाच्या टपरीवर तिघांनी १० हजाराची लाच स्विकारली त्याच वेळी एसीबीच्या पथकाने या तिघांना रंगेहाथ पकडले. या प्रसंगी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरगाण्यात तीन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

संबंधित विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप सांळुखे, पोलीस हवालदार नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, प्रविण महाजन,संतोष गांगुर्डे, विवेक देवरे यांनी पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्यामार्गदर्शनाखाली कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com