लाच स्वीकारण्याच्या तयारीत असलेला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारण्याच्या तयारीत असलेला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | Nashik

चेक बाऊन्सचे (Check bounce) प्रकरण मिटवून देण्यासाठी व तक्रारदाराविरुद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी २० हजारांची लाच (Bribe) मागितल्या प्रकरणी एका पोलीस हवालदारास (Police Constable) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) नाशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक (Arrested) केली आहे.....

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित राजेश हरी थेटे (५३) यांनी तक्रारदाराकडे आडगाव पोलीस ठाण्यात (Adgoan Police Station) चेक बाऊन्सचे (Check bounce) प्रकरण मिटवून देण्यासाठी व तक्रारदाराविरुद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी २५ एप्रिल २०२२ रोजी २० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करून रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिकचे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोहवा डोंगरे, पोना इंगळे, पोहवा गोसावी, पोना मानकर यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com