
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील भूमीअभिलेख कार्यालयातील दोघांसह एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने तीन लाख रुपयांची लाच (Bribe) घेतांना सापळा रचत अटक (Arrest) केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना त्यांच्या जागेतील फायनल लेआउटमध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र त्यांच्या गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात दौलत नथू समशेर (४३,व्यवसाय- नोकरी, शिरस्तेदार, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय त्रंबकेश्वर, वर्ग 3 रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भास्कर प्रकाश राऊत (56,व्यवसाय- नोकरी, (भू करमापक), उप अधीक्षक भूमि अभिलेख, कार्यालय, त्रंबकेश्वर.रा.रो हाऊस नं 3,4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुंचाळे शिवार, अंबड नाशिक),
वैजनाथ नाना पिंपळे (34, धंदा खाजगी मोजणी व बांधकाम व्यवसाय, राहणार रो हाऊस नंबर १, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती प्रथम सहा लाख व नंतर तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक .नारायण न्याहाळदे,उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सापळा पथक प्रकाश महाजन, किरण अहिरराव, अजय गरुड ,परशुराम जाधव यांच्या पथकाने सापळा रचून तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.