लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलिसात (Police) दाखल झालेल्या गुन्ह्यातून नावे वगळण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने ४० हजार रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना नामपूर (Nampur) पोलीस दूर क्षेत्राच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला नंदुरबार जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau) पथकाने रंगेहात पकडले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे आई-वडील व दोन्ही बहिणी अशा पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये जायखेडा (ता. बागलाण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्ह्यातून आई व दोन्ही बहिणींची नावे कमी करण्यासाठी नामपुर पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ महाजन (Jagannath Mahajan) याने ४० हजार ६०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्याचा पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये महाजन याने पंच साक्षीदारांसमोर स्वीकारले. त्यामुळे नामपूर दूरक्षेत्र (ता. बागलाण) येथून महाजन यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नंदुरबार जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी (Rakesh Chaudhari), सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक समाधान वाघ (Samadhan Wagh) यांच्यासह हवालदार उत्तम महाजन (Uttam Mahajan), विजय ठाकरे (Vijay Thackeray), पोलीस नाईक देवराम गावित (Devram Gavit) व मनोज अहिरे (Manoj Ahire) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com