५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटरचे 15 एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात ५१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी ठेकेदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारास त्याच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटरचे 15 एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात संशयित सुधीर भास्कर पठारे, 34, व्यवसाय - खाजगी ठेकेदार, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. जिल्हा. अहमदनगर.) याने आपल्या वैयक्तिक ओळखीचा फायदा घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीज कनेक्शन भार वाढवून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी अर्धी रक्कम म्हणजेच ५१ हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी मागितले.

५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात
सप्तशृंगी गड : विश्वस्थांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक, पाहा व्हिडीओ

त्यानंतर पंच साक्षीदारांच्या समक्ष ५१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पठारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीने ५१ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणी संशयितावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५१ हजारांची लाच घेणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात
अंबड वासियांच्या अर्धनग्न पायी मोर्चात नवा ट्विस्ट

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोहवा एकनाथ बाविस्कर, पोना प्रकाश महाजन, पोना राजेंद्र गीते, पोहवा संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com