नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्राला महापुरुषांच्या तसेच स्त्री चळवळीच्या विचारांचा खूप मोठा वारसा आहे. याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून महिला अत्याचारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वाढते अत्याचार थांबविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही या मागण्यांचे निवेदनही पाठविण्यात पाठविण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय घृणास्पद आहे. 29 वर्षीय तरुणीला नोकरीचे अमिष दाखवून शिरूर-कासार येथील मेहबूब शेख या नराधमाने तिच्यावर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. असा सिडको पोलीस ठाण्यात मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.

यामध्ये संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचा प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख याचे नाव या घटनेत आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले परंतु अद्यापही मेहबूब शेख ह्या नराधमाची चौकशी करून त्यास अटक झालेली नाही.

उलट याखेरीज सदर आरोपी हा त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य करत आहे. अशी लाजिरवाणी अशी बाब आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील पेण येथे तीन वर्षीय बालिकेवर एका जामिनावर सुटलेल्या नराधमाने अत्याचार करून हत्या केली.

हा प्रकार सुद्धा समाजमन ढवळून काढणारा आहे. तरी पोलीस प्रशासनाने औरंगाबाद व पेण येथील घटनांबाबत कोणत्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे या घटनेची लवकरात लवकर सखोल चौकशी करून पिडीतेला न्याय मिळवून द्यावा.

या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व नाशिक जिल्हा सहसंयोजक ऐश्वर्या पाटील, नाशिक महानगर मंत्री सिद्धेश खैरनार, महानगर सहमंत्री दिव्या सिंग, पंचवटी नगर मंत्री प्रियंका पाटील, हर्षदा कदम, संस्कृती शेळके, अथर्व कुळकर्णी, राकेश साळुंखे, ओम माळुंजकर, विराज भामरे आदी उपस्थित होते.