गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयितास अटक
गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे दर्शनाला घेऊन जाण्याचे बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) शितपेयात गुंगीकारक (Narcotic) औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Molestation)केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavti Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित आनंद म्हसदे ( 25, रा. मायको दवाखान्याजवळ, फुलेनगर, पंचवटी ) याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला उन्नती शाळेजवळून ( दि.18 ) त्रंबकेश्वर येथे दर्शनाला जाऊन येऊ असे सांगत दुपारी एक वाजेच्या सुमारास (Unnati school) त्र्यंबकेश्वर जवळील एका हॉटेलमध्ये नेले.

त्यानंतर शीतपेयाच्या बाटलीमध्ये गुंगीकारक औषध देऊन पीडितेवर बळजबरीने अत्याचार करीत बलात्कार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण( पोस्को Posco ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयितास अटक करण्यात आली आहे. या याप्रकरणी पुढील तपास महिला उपनिरीक्षक डी.एस.पाटील करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com