खत,बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध- कृषीमंत्री भुसे

खत,बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध- कृषीमंत्री भुसे

नाशिक । प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकर्‍यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खत, बियाणे उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागाचे नियोजन असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे..

येत्या खरीप हंगामात आवश्यक प्रमाणात खतांची, बियाणांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून खत, बी, बियाणे याची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही असे सांगत भुसे यांनी शेतकर्‍याची युरीयाची मागणी ही जास्त असल्याने त्या वाढीव प्रमाणात युरीया, इतर खत उपलब्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा प्रस्तावाबाबत जिल्हयातील प्रस्तावाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री सत्तार यांच्या सूचनेनुसार संबंधित प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरुन पथक पाठवून चौकशी केली जाईल. तसेच या चौकशीत दोषीं असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही भुसे यांनी सांगितले.

राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा मिळून साधारणत: पाच हजार आठशे कोटी रुपये पिक विम्याची रक्कम होत आहे. त्यापैकी आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार व एक हजार कोटी रुपये रक्कमेची नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिली जात आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या चार हजार आठशे कोटी रुपये कंपन्याना मिळताय, ही फार गंभीर गोष्ट आहे.

त्यामुळे यासंदर्भात ज्या ज्या पातळीवरुन चौकशी करावी लागेल त्या पध्दतीने चौकशी केली जाईल. त्यासोबतकडे केंद्र शासनाला विम्याचे प्रारुप बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पीक विम्याचे बीड प्रारुप 80 -110 हे राज्यव्यापी लागू करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे दिला असल्याचे कृषीमंत्र्यानी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com