जि.प.सदस्यांची वित्त आयोग प्रशिक्षणाकडे पाठ

जि.प.सदस्यांची वित्त आयोग प्रशिक्षणाकडे पाठ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी नियोजनाबाबतची माहिती Information on the funding planning of the 15th Finance Commission देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत Grampanchayat विभागातर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास अवघ्या २२ सदस्यांनीच हजेरी लावली. त्यातही महिला सदस्यांचीच संख्या अधिक होती. जिल्हा परिषदेच्या ७२ पैकी बहुसंख्य सदस्यांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचे चार हप्ते मिळाले आहेत. यापूर्वी दिलेला निधी खर्च करा त्याशिवाय पुढचा निधी मिळणार नाही, असा निर्णय सरकारने घेतलेला असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून निधी नियोजनाचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सदस्यांना विकास आराखडा तयार करणे, बंधित निधी, अबंधित निधी, कामांची निवड, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर प्रस्तावित करावयाची कामे याबाबत माहिती मिळावी म्हणून ग्रामपंचायत विभागाने ५ व ६ ऑक्टोबरला अनुक्रमे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यात पंचायत समिती सदस्यांनी या प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद दिला.

मात्र, दुसऱ्या दिवसाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रशिक्षणास अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, सभापती अश्विनी आहेर, संजय बनकर यांच्यासह यशवंत ढिकले, नयना गावित, गितांजली पवार-गोळे, शकुंतला डगळे, कलावती चव्हाण, अनिता बोडके, छाया गोतरणे, अशोक टोंगारे, साधना गवळी, लता बच्छाव, नुतन आहेर, कविता धाकराव, शोभा कडाळे, संगिता निकम, जगन्नाथ हिरे, सविता पवार, महेंद्र काले, सुरेश कमानकर हे २२ सदस्य उपस्थित होते.

याततही अनेक सदस्यांनी केवळ सही करण्यापुरती उपस्थिती दाखविली. त्यामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षणास १५ सदस्य उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यातही महिला सदस्यांची संख्या अधिक होती. महिला सदस्यांनी प्रशिक्षणाबाबत उत्सुकता दाखवून पंधरा वित्त आयोगाच्या निधी नियोजनाबाबतच्या तरतदुी समजून घेतल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.