
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या घटनेतील फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपासासाठी त्याला आडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे...
रविंद्र दिलीप गांगुर्डे (३५, व्यवसाय-पेंन्टींग कॉन्ट्रॅक्टर, रा. बिल्डींग नंबर २, रूम नंबर ६३, निलगीरी बाग, यश लॉन्ससमोर, औरंगाबाद रोड, नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरात घडलेल्या गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आडगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गांगुर्डे हा गुन्हा घडल्या पासुन पसार होता. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत होते.
संशयित गांगुर्डे हा दि. 5 मे रोजी नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना मिळाली होती. त्या प्रमाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा लावुन गांगुर्डेला शिताफीने ताब्यात घेतले. तर पुढील तपास व कारवाई साठी आडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथकातील सपोनि प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि दिलीप भोई, सपोउनि दिलीप सगळे, पो. हवा. किशोर रोकडे, राजेश भदाने, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर पो. अंमलदार विठ्ठल चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व मपोशि. सविता कदम यांच्या पथकाने केली.