
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक पोलीस आयुक्तालय खंडणी विरोधी पथकाने मोठा कामगिरी करुन फरारी भामट्याला जेरबंद केले आहे. त्याच्यावर शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मुंबईनाका भागात येणार असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकाचे राजेश भदाणे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून पाहिजे असलेला फरार संशयीत मुक्ताजी सखाराम गुंजाळ (62, रा. सखा बंगला, प्लॉट नंबर 28, नेल्सन हॉस्पिटलच्या मागे, तुपसाखरे नगर, अहिल्यादेवी मार्ग, मुंबई नाका, नाशिक) याला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. ही कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोनि विद्यासागर श्रीमनवार, सपोनि प्रविण सुर्यवंशी, दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, राजेश भदाणे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण व मपोशि सविता कदम यांच्या पथकाने केली आहे.