
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेला तसेच मागील काही काळापासून फरार असलेल्या संशयित आरोपीला खंडणी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे...
यश राजेद्र शिंदे (वय २४, रा. श्रीराम चौक शिवदर्शन अपार्टमेंट, बी -८, जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन जवळ, राजीव नगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे. तो गुन्हा घडल्यापासून पसार झालेला होता. खंडणी विरोधी पथकाचे दत्तात्रेय चकोर व स्वप्नील जुंद्रे यांना त्याच्या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती की, फरार आरोपी हा अश्वमेघ नगर, आर. टी. ओ. ऑफिस जवळ, पेठ रोड, नाशिक येणार आहे.
त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी यशला यास येथून शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपीवर यापुर्वी उपनगर, मुंबई नाका आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण सूर्यवंशी, दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, राजेश भदाणे, योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर, स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, विठ्ठल चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.