
दिंडोरी | Dindori
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी विकास मंडळ आणि के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीर वसंतराव नाईक अभिरूप संसद स्पर्धेचे’ (Krantiveer Vasantrao Naik Abhirup Sansad competition)आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी ( Dindori) येथील विद्यार्थी विकास मंडळातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि महाविद्यालयास ट्रॉफी (Trophy) मिळाली असल्याने, सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे (Principal Dr. Rajendra Sangle), उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, प्रा. डॉ. रुपाली शिंदे आणि इतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण (rural) भागातील महाविद्यालयाच्या संघाने जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी संघातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशस्वी संघात साक्षी शरद वडजे, शेळके पौर्णिमा संजय, गावंडे अर्चना सुरेश, शिंदे गणेश धोंडीराम, आपसुंदे संकेत भाऊसाहेब, गायकवाड युवराज कांतीलाल, थेटे समाधान सोपान, गुंजाळ लक्ष्मण गुलाब, चौधरी देविदास माधव, महाले सुनील नीलकंठ, चौधरी यादव तानाजी, गवळी माधव योगीराज या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्या यशासाठी विद्यार्थी विकास अधिकारी (Student Development Officer) प्रा. डॉ प्रल्हाद दुधाणे आणि प्रा. अमोल गाढे यांनी मार्गदर्शन केले.