अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपीला उस्मानाबाद येथून अटक

FIR
FIR

वावी। वार्ताहर

तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथून अल्पवयीन (Minor) मुलीचे अपहरण करुन फरार झालेल्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वावी पोलिसांना यश आले असून उस्मानाबाद येथून त्याला अटक करण्यात आले आहे.

21 सप्टेंबर 2022 रोजी नांदुरशिगोटे येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction of a minor girl) झाले होते. मुलीच्या घराजवळून आरोपी अनिल दिघे याने फुस लावुन तिला पळवून नेले होते. त्यामुळे मुलीचे काका यांनी वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police Station) तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपी हा कोणत्याही प्रकारचा मोबाईल संभाषण गावातील व नातेवाईक यांच्याशी ठेवत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलीसांकरीता आव्हानात्मक झाले होते.

FIR
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठकीत नेमकं काय ठरलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यानच्या काळात मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीचे वडील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व नांदुर शिगोटे पोलीस चौकी (Nandur Shigote Police Station) समोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार पोलीसांकडून संशयित आरोपीचे वडील, भाऊ व मित्र यांना अटक करण्यात आली होती. मात्र, तरीही आरोपीचा शोध लागत नव्हता.

दरम्यान, 18 मार्च रोजी वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. टी. तांदळकर यांना आरोपी अनिल व पिडीत मुलगी उस्मानाबाद येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तांदळकर, पोना मैद, पोशि शेलार हे रवाना उस्मानाबादला झाले. आरोपी व पिडीत मुलगी यांना तात्काळ ताब्यात घेऊन वावी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

FIR
तब्बल २५ हजार स्वेअर फुटांची भव्य महारांगोळी !

सदर पिडीत मुलीस महिला पोलीस अमंलदार व आई समक्ष घेउन तिचा जबाब नोंदविला. त्यानुसार आरोपीवर भादंवि कलम 376, 366, 323, 506 सह बाल लैंगिक अत्याचार (Sexual assault) कायदा कलम 4, 6, 8, 12, 16 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तांदळकर करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com