नाशिक । Nashik

शहरातील जिल्हा रुग्णालयातून पळवून नेलेली दीड वर्षाची चिमुकली अखेर सापडली आहे. पोलिसांच्या पथकास अखेर तिला शोधण्यात यश आले आहे.

दरम्यान सीबीएस परिसरात हि चिमुकली सापडली असून अपहरणकर्ता फरार झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांना हि चिमुकली आढळून आली आहे. तर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरूच आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून दुपारच्या सुमारास दीड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाले होते. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. यानंतर शहर पोलिसांची तीन पथके चिमुकलीचा शोध घेत होते.

अखेर आज पहाटेच्या सुमारास पोलीस पथकास यश आले असून त्या निरागस चिमुकलीचा शोध लागला आहे. सीबीएस परिसरात या मुलीला टाकून अपहरण करणारा भामटा फरार झाला आहे. शहर पोलीस या भामट्याचा कसोसीने शोध घेत आहे.