आशा-गटप्रवर्तकांचा संपाचा इशारा

आशा-गटप्रवर्तकांचा संपाचा इशारा
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आशा व गटप्रवर्तक Asha-group promoters यांना कोविड-19 Covid-19 चे काम करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता Incentive allowance करोना असेपर्यंत पूर्वरत करावा,या मागणीबरोबरच आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन द्या, या मागणीसाठी दि. 24 सप्टेंबरला देशव्यापी संप Nationwide strike करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना(आयटक)चे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आशा महिलांना दररोज 33 रुपये भत्ता मिळत होता. त्यामध्ये त्या दररोज चार ते पाच तास काम करत होत्या. गटप्रवर्तक महिलांना तर दररोज साडेसतरा रुपये भत्ता मिळत होता.

मात्र,दि.1 सप्टेंबर नंतरही कोविडचे काम सुरू आहे. आशा व गट प्रवर्तकना फक्त कामाचा मोबदला मिळतो. म्हणून करोनाचे काम फुकट शासनाने करून घेऊ नये. करोना कामाचा मोबदला दिला नाही तर करोना कामावर देशभर बहिष्कार टाकण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच देशभर 24 सप्टेंबर रोजी योजना सर्व कर्मचारी देशभर एक दिवसीय संप करून आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन 21 हजार रुपये द्या. सामाजिक सुरक्षा द्या. भविष्य निर्वाह निधी लागू करा, आरोग्य विमा संरक्षण द्या, मोफत काम करून घेणे बंद करा आदी मागण्यासाठी संप करण्यात येणार आहे.

दि. 1 एप्रिल 2021 पासून ते आजपर्यंत पाच महिन्याचे मानधन आशांना दरमहा दोन हजार व गटप्रवर्तक महिलांना तीन हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ते ताबडतोब मिळणे आवश्यक आहे. असे न झाल्यास दि. 24 सप्टेंबरपासून आशा व गटप्रवर्तक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनावतीने देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com