आमदारांनी सरकारी घरांना नकार द्यावा

आमदारांनी सरकारी घरांना नकार द्यावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधिमंडळ सभागृहात राज्यातील ३०० आमदारांना फ्लॅट देण्याची घोषणा करताच जनतेमध्ये त्याचा तीव्र संताप करण्यात येत असून, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....

त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पक्षाने (aam aadmi party) नाशिक शहरातील आमदारांची भेट घेऊन आमदारांनी सरकारी घरे नाकारावीत अशी मागणी (Demand) केली आहे.

राज्य सरकारच्या (State Government) निर्णयासंदर्भात आम आदमी पार्टी नाशिक शहराध्यक्ष गिरीश उगले-पाटील (Girish Ugle-Patil) यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील चारही आमदारांना प्रत्यक्ष भेटून सरकारी फ्लॅट मोफत मिळत असला तरी न घेण्याची विनंती करणारे निवेदन सादर करण्यात आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपचा (BJP) एकही आमदार मोफतचे सरकारी फ्लॅट घेणार नाहीत असे जाहीर केले आहे. त्यामुळे आमचादेखील त्यास विरोध असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांनी आआपाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले.

नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला असता आपण फ्लॅट घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनीदेखील फ्लॅट स्वीकारण्यास नकार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahite) यांच्या कार्यालयात आआपातर्फे निवेदन देण्यात आले. मोफत फ्लॅट घेण्याच्या निर्णयाविरोधात आआपातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील, स्वप्नील घिया, चंदन पवार, दीपक सरोदे, चंद्रशेखर महानुभव, योगेश कापसे, बंडू डांगे, सुनील जोरवर, प्रभाकर वायचळे, योगेश कापसे, ॲड. अभिजित गोसावी, ॲड. भूषण टाटिया, प्रकाश कनोजे, रितेश सुराणा आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com