आमचे गौराईल एकच पान बाई, एकच पान..!

आदिवासी भागात अशी करतात गौराई
आमचे गौराईल एकच पान बाई, एकच पान..!

नाशिक | Nashik

आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण साधेपणाने साजरा करण्यात आला.

त्र्यंबक, हरसूल, पेठ, सुरगाणा आदी भागांत या सणाला विशेष महत्व आहे.

अक्षयतृतीय अर्थात आखाजी हा आदिवासी भागातील मोठा सण मानला जातो. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या आठ दिवसांआधी गौराई आवर्जून पेरलीच जाते. म्हणजे सात प्रकारचे धान्य बांबूची टोपलीत पेरले जाते. रोज थोडं थोडं पाणी शिपडुंन पेरलेलं धान्य वाढत असते. जशी या धान्याची वाढ होते, त्याचप्रकारे येणाऱ्या वर्षी पीक जोमात येते अशी येथील लोकांची धारणा आहे.

खरिपाच्या हंगामाला सुरवात होत असल्याने पीक पाणी पीकु दे, यासाठी आळवणी म्हणून हा सण आदिवासी भागात साजरा केला जातो. या दिवशी मुली, महिला उगवलेले धान हाताने तोडून केसात माळतात. तर झाडाला झोके बांधून गाणी म्हटली जातात.

परंतु यंदा करोनाचे सावट असल्याने साधेपणाने साजरी करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com