राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाला सुवर्ण; मुकूंदला रौप्य पदक

राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाला सुवर्ण; मुकूंदला रौप्य पदक

मनमाड । प्रतिनिधी Manmad

पंजाबच्या पतियाळा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवक ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत ( National Youth Junior Weightlifting Championships ) मनमाडचे विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी देखील सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून शहराचे नाव उज्वल केले आहे. छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आकांक्षा किशोर व्यवहारे ( Aakansha kishor vyavhare ) हिने सुवर्णपदक तर मुकूंद संतोष आहेरने (Mukund Santosh Aaher ) रौप्यपदक मिळविल्याचे वृत्त येताच आ. सुहास कांदे यांच्यासह शहरातील क्रीडा प्रेमी, खेळाडू नागरिकांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.

भारतीय क्रिडा प्राधिकरणतर्फे पंजाबच्या पतियाळा येथे 16 व्या राष्ट्रीय युवक वेटलिफ्टींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग संघाचे प्रतिनिधत्व मनमाडच्या जयभवानी व्यायाम शाळेची खेळाडू करीत असून आज आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 40 किलो वजनी गटात 120 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर आंतरराष्ट्रिय खेळाडू मुकूंद संतोष आहेर याने 55 किलो वजनी गटात 211 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.

यशस्वी या खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, प्रशिक्षक तृप्ती पराशर यांचे मार्गदर्शन लाभले. आकांक्षा हिने सुवर्ण आणि संतोष याने रौप्य पदक मिळविल्याचे वृत्त येताच आ. सुहास कांदे, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, छत्रे विद्यालयाचे पी.जी. धारवाडकर, अध्यक्ष पी.जे. दिंडोरकर, दिनेश धारवाडकर, नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका के.एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर.एन. थोरात, पर्यवेक्षक संदीप देशपांडे, मोहन गायकवाड, डॉ. विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा. दत्ता शिंपी यांच्यासह क्रीडा प्रेमी, नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com