नवा मोबाईल न दिल्याने तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नवा मोबाईल न दिल्याने तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

सातपूर | Satpur

श्रमिकनगर येथील गंगासागर नगरातील युवकाने नवीन मोबाईल न मिळाल्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. अक्षय अरुण खेताडे (23) असे मयताचे नाव आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रमिक नगरामधील गंगासागर नगरातील साई हाइट्स येथे राहणारा अक्षय अरुण खेताडे याचा मोबाईल हरवल्याने त्यांनी कुटुंबीयांकडे नवीन मोबाईलसाठी मागणी केली.

घरच्यांनी त्याला मोबाईलसाठी पैसे दिले नाही याचा राग आल्यामुळे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याने घरातील दरवाजे बंद करून चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

नवा मोबाईल न दिल्याने तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
नाशिकरोडला अपघाताची मालिका सुरूच; वाहनाच्या धडकेत दोन ठार

यात अक्षय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे सातपूर परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com