पोलीस भरतीत नापास होण्याच्या भितीने तरुणाची आत्महत्या

पोलीस भरतीत नापास होण्याच्या भितीने तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक | प्रतिनिधी Navin Nsahik

पोलिस भरती (Police recruitment) परीक्षेत (exam) कमी गुण मिळाल्याच्या भितीने एका तरुणाने विषारी औषध (Toxic drug) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.राहुल भानुदास चौगुले (वय 22 रा. एक्सलो पॉईंट, अंबड) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास चौगुले यांचा मुलगा राहुल याने गेल्या आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत नापास (fail) होणार असल्याच्या भीतीने त्याला नैराश्य आले. या नैराश्येतून राहुलने शनिवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला उलट्या व अन्य त्रास होऊ लागल्याने त्याचे वडील भानुदास चौगुले यांनी राहुलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अकस्मात मृत्यूची (sudden death) नोंद करण्यात आली असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास चव्हाण,अमीर शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com