
उमराणे । वार्ताहर Umrane
नाशिक येथून मालेगाव साठी निघालेल्या गर्भवती महिलेने उमराणे गावाजवळील राहुड घाटाजवळ नाशिक मालेगाव बसमध्येच गोंडस मुलाला जन्म दिला मालेगाव येथील आयेशा नगर भागात राहणाऱ्या नाझमी शेख या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या काल दिनांक एक जून रोजी नाशिक येथे द्वारकेजवळ राहणाऱ्या त्यांच्या आई झाकीर खान यांचे दुर्दैवाने निधन झाले होते , त्यांच्या पती पत्नी अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
आज पहाटे त्यांना त्रास सुरू झाला म्हणून ठक्कर बाजार जवळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना सकाळी सात वाजता दाखल करण्यात आले होते प्रसव वेदना जास्त होत होत्या वेळोवेळी त्यांनी संबंधित डॉक्टरांना याबद्दल सूचनाही दिल्या दुपारी एक वाजून गेला तरी सिव्हिल मधील डॉक्टरांनी व्यवस्थित लक्ष दिले नाही प्रसूती होण्यास दोन दिवस लागतील असे सांगितले, वैतागून त्यामुळे त्यांच्या परिवाराने मालेगावी जाण्याचा निर्णय घेतला व दुपारी दोन वाजता मालेगाव नासिक बसने पती आबीद शेख सह मालेगाव येण्यासाठी निघाले राऊड घाटात स्पीड ब्रेकर वर बस आदळल्याने जास्त त्रास होऊ लागला व घाट पास झाल्यानंतर बस मध्येच बाळाची प्रसुती झाली.
यावेळी वाहक सुरेखा वाघ यांनी तत्परता दाखवून प्रसुती केली चालक विजय नेरकर यांनी समय सूचकता दाखवून तात्काळ बस सौंदाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय ततार ,डॉ ऐश्वर्या पणपालीया, डॉ राकेश पवार ,डॉ राजेश सावन्त , सुरेखा देवरे ,आरोग्य सेविका लीला आहेर,उमेश ठोके आदी प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय मदत केली बाळ सुखरूप असून आबिद शेख यांनी बस वाहक व चालक यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे .