दिंडोरीतील महिलेने केली आधुनिक शेती

दिंडोरीतील महिलेने केली आधुनिक शेती

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

कठीण परिस्थितीत हार मानण्यात कोणतीही हुशारी नसते. परिस्थती कितीही बिकट व प्रतिकूल असली तरीही मनुष्याने संघर्ष करून त्यावर मात करण्यातच खरा आनंद आहे. नशिबाच्या भरवशावर बसणार्‍या लोकांच्या पदरी नेहमी निराशा येते. आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भाग्य ठरविले आहे, दिंडोरी तालूक्यातील (Dindori taluka) पूनम डोखळे (Poonam Dokhale) ह्या शेतकरी महिलेने (Farmer woman).

पारंपारिक पद्धतीने शेती न करता कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात द्राक्षबागा सह अन्य शेतीची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, भरघोस घेण्यात यशस्वी ठरल्या आहे. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव (Khedgaon) येथील पूनम डोखळे महिला शेतकरी यांच्याकडे पाच एकर द्राक्ष शेती (Grape farming) आहे.

त्यांनी शेती व्यवसायात असे स्थान मिळवले आहे.की शेतकरी वर्ग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. महिला शेतकर्‍यांसाठी online पध्दतीने शेती शाळेचे आयोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करून उन्नत शेती करण्याचे धडे त्या देत आहेत.

ग्रामीण भागातील महिलांचा पुर्वीपासून शेती व्यवसायात हातभार लागला आहे. परंतु तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगतशील शेती करावी व शेतीत विविध पिके घेऊन आपल्या उत्पन्नात भर कशी पाडावी याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन आत्त्मसात करीत स्वनुभवाने एक उत्तम प्रकारे महिला शेतकरी म्हणुन त्यांनी पंचक्रोशीत ओळख निर्माण केली आहे.

आज उन्नत शेती (Advanced farming) करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. शेतकरी महिला असे तंत्रज्ञान आत्मसात करून, शेती करण्याकडे वळल्या पाहिजे. महिलांचा कल आधुनिक शेतीकडे करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या वतीने सहकार्य लाभत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com