इगतपुरीतील अग्नितांडवात एका महिलेचा मृत्यू

इगतपुरीतील अग्नितांडवात एका महिलेचा मृत्यू

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company)आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली.

त्यानंतर घटनास्थळाला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी संवाद साधत घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती दिली.

यावेळी गमे म्हणाले की, आतापर्यंत १४ जखमी कामगारांना रेस्क्यू करण्यात आले असून यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ११ जणांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तर डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कंपनीतील बॉयलरमचा भीषण स्फोट (Explosion) झाल्याने आग लागली. त्यावेळी आजूबाजूच्या गावांना याचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने १४ जणांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी मेडिकल कॉलेज, वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयांत १०० बेड राखी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, जिंदाल कंपनीच्या अवघ्या १५० मीटर अंतरावर २० हजार क्षमता असलेला डिझेल टॅंकर असून तो पेटला तर आगीचे लोळ १ किलोमीटरच्या परिसरात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पेटू नये यासाठी प्रशासनाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आगीने रौद्र्यरूप धारण केल्याने धुराचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाल्याने प्रशासनाला बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com