भावली धरणात आढळला महिलेचा मृतदेह

भावली धरणात आढळला महिलेचा मृतदेह

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

दोन दिवसापूर्वी तळोशी (Taloshi) येथील बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह (Dead Body) भावली धरणात (Bhavli Dam) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे...

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) तळोशी येथील महिला संगिता शिवाजी गुंजाळ (४७) (Sangita Shivaji Gunjal) या दोन दिवसापूर्वी मैत्रिणीकडे जात आहे असे सांगून घोटी शहरातून (Ghoti City) बेपत्ता झाल्या होत्या.

याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार (दि.१५) रोजी सकाळच्या सुमारास संगिता गुंजाळ यांचा मृतदेह भावली धरणात आढळून आला.

भावली धरणात आढळला महिलेचा मृतदेह
नाशिक : पोलीस आयुक्तालयातील आठ वरिष्ठ निरीक्षक होणार सहायक आयुक्त

तसेच मृत महिलेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून सदर महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची (Death) नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे (PI Vasant Pathway) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com