जुन्नर येथील राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेत इगतपुरीतून आदिवासी बांधव हजेरी लावणार

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

घोटी | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे एक आक्टोबर रोजी बिरसा बिग्रेड सह्याद्रि/सातपुडा यांच्या वतीने आदिवासी चौथरा / काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद होत आहे. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, भारतीय ट्राईबल पार्टीचे संस्थापक महेशभाई वसावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीतीत ही राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद होणार आहे.

जुन्नर येथील 'आदिवासी चौथरा काळा चबुतरा ठिकाण म्हणजे कार्यकर्त्यांसाठी समाजातील अन्याया विरुध्द लढण्यासाठी उर्जा देणारे शक्ती स्थळ असून कोळी महादेव, ठाकर, कातकरी, वारली, कोकणा, भिल्ल व समस्त आदिवासी बांधवांसाठी आपल्या शुरवीरांचा इतिहास सांगणारे स्मृतीस्थळ देखील आहे.

याच ठिकाणी सर्वच आदिवासी बांधवांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवून त्यांच्या इतिहासाच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा. मु. जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे. या ठिकाणी 'आदिवासी चौथरा काळा चबुतरा अभिवादन दिना निमित्त 'राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद २०२३' या कार्यक्रमाचे बिरसा ब्रिगेड- सह्याद्री सातपुडा यांनी आयोजन केले आहे.

बिरसा ब्रिगेडच्या वतीने अभिवादन सभा होणार असून या सभेसाठी इगतपुरी तालुक्यातून हजारो बांधव जाणार असल्याची माहिती बिरसा ब्रिगेड सह्याद्री संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी दिली आहे.

तरी समाजातील सर्व शेतकरी, कष्टकरी, कर्मचारीवर्ग आणि समाजबांधव, समाज संघटना, पदाधिकारी, शैक्षणिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांना या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन बिरसा बिग्रेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कचरु कोरडे, नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल गभाले, तालुकाध्यक्ष शरद बांबळे, समन्वयक नवनाथ लहांगे, यशवंत पारधी यांनी दिली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com