घरकुल अनुदानासाठी उपोषणाचा इशारा

घरकुल अनुदानासाठी उपोषणाचा इशारा
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

न्यायडोंगरी । वार्ताहर | Nyadongri

जळगाव खुर्द (Jalgaon Khurd) येथील निराधार विधवा महिलेस (Widowed women) प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) मिळालेल्या घरकुलाचे काम पूर्ण होऊनही

शेवटचा हप्ता बँक खात्यावर वर्ग करण्याऐवजी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवेमार्फत (Public Financial Management Services) परराज्यातील अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर वर्ग झाल्याचा प्रकार नांदगाव पंचायत समितीत ( Nandgaon Panchayat Samiti) घडला. याबाबत लाभार्थ्याने न्यायासाठी पंचायत समिती (panchayat samiti) कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा (hunger strike) इशारा दिला आहे.

जळगाव खुर्द, ता. नांदगाव (nandgaon) येथील रहिवाशी मीना बाबासाहेब सरोदे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या विधवा (Widow of a suicidal farmer) असल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्यानुसार त्यांनी केलेल्या बांधकामानुसार वेळोवेळी घरकुलाचे हप्ते त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) न्यायडोंगरी शाखेतील बचत खाते क्र. 60145223957 वर मिळाले. मात्र घरकुलाचे काम पूर्ण झाल्यावर तांत्रिक अधिकार्‍यांनी दिलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार अंतिम हप्ता लाभार्थ्याच्या निर्धारित बँक खात्यावर वर्ग झाला नाही.

बर्‍याच प्रतीक्षेनंतरही घरकुलाचा अंतिम हप्ता बँक खात्यावर वर्ग न झाल्याने लाभार्थ्याने नांदगाव पंचायत समिती (Nandgaon Panchayat Samiti) कार्यालयात समक्ष चौकशी केली असता घरकुलाचा अंतिम हप्ता यापूर्वीच दिला गेला असून पीएफएमएस प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाच्या आधारे हा अंतिम हप्ता वर्ग झाळ्याची माहिती देण्यात आली. मात्र लाभार्थ्याचे बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठेही खाते नसल्याने अधिक चौकशीअंती मध्यप्रदेशातील अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर सदर लाभार्थ्याच्या अंतिम हप्त्याची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा प्रणालीद्वारे (Public financial management services system) वर्ग झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबत लाभार्थ्याने पंचायत समिती कार्यालयास योग्य ती कार्यवाही करून घरकुलाचा अंतिम हप्ता लाभार्थ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या न्यायडोंगरी शाखेतील बचत खाते क्र. 60145223957 वर वर्ग होण्याबाबत वारंवार विनंती केली. मात्र पंचायत समिती कार्यालयातील यंत्रणेने मीना सरोदे या विधवा लाभार्थ्याची कुचेष्टा करत अद्यापही घरकुलाच्या अंतिम हप्त्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग केली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याने गटविकास अधिकार्‍याकडे याबाबत तक्रार करत सोमवार, दि. 9 मेपर्यंत घरकुल अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग न झाल्यास

मंगळवार दि. 10 मेरोजी सकाळी 11 वाजेपासून कुटुंबासह नांदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जळगाव खुर्दचे उपसरपंच यशवंत जाधव यांनीही विधवा लाभाथ्याच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करत अन्यायग्रस्त न्याय मिळवून देण्याची मागणी केली. न्याय न मिळाल्यास लाभार्थ्याच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याचा इशारा त्यांनी दिला असून निवेदनाच्या प्रती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाठविल्या आहेत.

Related Stories

No stories found.