प्रस्तावित उड्डाण पूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

प्रस्तावित उड्डाण पूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेतर्फे NMC शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक असा प्रस्तावित उड्डाणपुलाला The proposed fly over from City Center Mall to Trimurti Chowk स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे. म्हणून उड्डाणपुल त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. उड्डाण पूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले. करोनामुळे मनपाची आर्थिक घडी बिघडली असतांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत विकासकामे केल्याची बतावणी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी जनतेच्या पैश्यातून तब्बल २५० कोटींची उधळपट्टी करण्याचा घाट घालण्यात येत आहे.

हा उड्डाणपूल उभारला गेल्यास येथील हजार ते पंधराशे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद पडून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे.भरवस्तीतल्या या परिसरात उड्डाणपुल झाल्यास पुलाखाली समाजकंटकांचा अड्डा होऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार असल्याची भीती आहे. परिसरात तीन ते चार पिढ्यांपासून वसलेल्या उंटवाडी गावातील अनेक कुटुंबे हा उड्डाणपूल झाल्यास उध्वस्त होणार आहे.

सिडको प्रकल्पामुळे विस्थापित होऊन येथे जागा मिळालेले भाजीपाला विक्रेते, परिसरातील छोटे दुकानदार, व्यापारी, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, फळविक्रेते या उड्डाणपूलामुळे देशोधडीस लागणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित या उड्डाणपूलामुळे उलट वाहतूक यंत्रणा विस्कळीत होणार असून या ठिकाणी गरज नसताना हा पूल कोणाच्या हट्टापायी उभारला जातोय, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

हा प्रस्तावित उड्डाणपूल त्वरित रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले आदींच्यासह्या आहेत.

Related Stories

No stories found.