वीजबिल माफीसाठी आंदोलनचा इशारा
नाशिक

वीजबिल माफीसाठी आंदोलनचा इशारा

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरिक, शेतकरी बांधव व छोटे छोटे व्यापारी हे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेले आहेत. शासनाच्या आदेशानुसार हे घटक घरी बसून असल्याने या तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाईचे जिल्हा संघटक संतोष कटारे व शहराध्यक्ष सुरेश निकम यांनी दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे मार्गदर्शनानुसार, रिपाई शहर शाखा, संतोष कटारे फाउंडेशन, डायमंड ग्रुप, विश्वभूषण मित्र मंडळ, जबरी ग्रुप आदींच्या वतीने संतोष कटारे व सुरेश निकम यांचे नेतृत्वाखाली येथील वीज मंडळाने नागरिकांना पाठविण्यात आलेले बिले अव्वाच्या सव्वा असून ते माफ करावे यासाठी ‘आक्रोश मोर्चा’ नेऊन निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी कटारे, निकम यांनी गोरगरीब, हातमजूर, शेतकरी व छोटे छोटे व्यापारी यांचे गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे आर्थिक उत्पन्न घटले आहे. घरीच असलेल्या नागरिकांना वीज बिलाची रक्कम अव्वाच्या सव्वा आकारण्यात आली असून नागरिकांना ती रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळे हे वीज बिल कमी करावे अथवा माफ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. याबाबत चर्चा करताना वीज वितरण कंपनीचे अभियंता संदीप चव्हाण यांनी वीज बिलाबाबतची सर्व माहिती उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. जर चुकून कोणाचे बिल जास्त लागले असेल त्यांना ते दुरुस्त करून देण्यात येइल.असे सांगण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

याप्रसंगी प्रवीण गजार, संतोष गायकवाड, प्रवीण भालेराव, राजू जाधव, गिरीष मोरे, रविंद्र गांगुर्डे, संतोष भडंंगे,दिनेश कटारे, राजू वाघमारे, राजू सोनवणे, विजय साळवे,उमेश कटारे,संतोष पगारे, भय्यासाहेब कटारे, आजम खान,शिवराज मोरे, जमीलभाई सय्यद, विशाल काळे, कुणाल काळे, कुणाल जाधव, भगवान भालेराव, विनोद नितनवरे, आदर्श बोर्डे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com