डॉक्टर दांपत्याकडून समाजापुढे अनोखा आदर्श

डॉक्टर दांपत्याकडून समाजापुढे अनोखा आदर्श

वाजगाव | शुभानंद देवरे Vajgaon

वाढदिवसाचे Birthday औचित्त साधून दोन्ही पायाने अपंग Handicap in both legs असलेल्या मुलीस अपंगबूट व कुबडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करणारे देवळा येथील डॉ.दांपत्याने अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला.

वाजगाव (ता.देवळा) येथील आदिवासी कुटुंबातील काळू शंकर सोनवणे यांची मुलगी विमल सोनवणे हि जन्मापासून दोन्ही पायाने अपंग असल्याने आपल्या दोन्ही हातांच्या आधारे घरातून बाहेर ये-जा करत असते, व जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिचे वडील उचलून घेऊन जात असे हे सर्व गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सुरु आहे.

तालुक्यातील मुळचे गुंजाळनगर येथील रहिवासी असलेले सध्या देवळा येथे जुन्या तहसील कार्याल्यासामोरील धनदाई हॉस्पिटल चालवत असलेले डॉ.त्रंबक देवरे Dr. Trimbak Devre यांची पत्नी डॉ.त्रिवेणी देवरे Dr. Triveni Devre दांपत्याने वाढदिवसासाठी वेगवेगळे विचार आखले पण वाढदिवस साजरा व्हावा आणि नको तो अवांतर खर्च नको होणाऱ्या खर्चाचा सदउपयोग व्हावा असा विचार केला.

.त्रिवेणी देवरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्त साधून वाजगाव ता.देवळा येथील आदिवासी बांधव काळू शंकर सोनवणे यांची अपंग मुलगी विमल सोनवणे ही स्वतःच्या पायावर स्वतः उभी रहावी यासाठी अपंग बूट व कुबड्या भेट दिल्या..

मिळालेले साहित्य पाहून विमल यांच्या चेहरा एकदम खुलून गेला आणि मी स्वतः माझ्या पायावर उभी राहू शकते ह्या आत्मविश्वास बाळगून बूट व कुबड्यांच्या आधारे घरातून बाहेर आली. हे पाहून सोनवणे परिवारातील सर्वच सदस्यांचे चेहरे आनंदाने खूलुन गेले. सुरुवातीला नवीन असल्याने काही वेळा आधाराची आवश्यकता जाणवेल पण हळूहळू ती स्वतः उभी राहील अशी माहिती डॉ.त्रंबक देवरे दांपत्यानी दिली.

ह्या वाढदिवसाच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा होऊन डॉ.त्रंबक देवरे दांपत्याचे सर्वच स्थरावरून कौतुक केले जात असल्याने सर्वांनी याप्रमाणे वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून गरजूंना मदत व्हावी अशी चर्चा होत आहे.

यावेळी डॉ.त्रंबक देवरे, सौ.त्रिवेणी देवरे, केंद्रीय मानवाधिकार संगठन, दिल्ली नाशिक जिल्हाध्यक्ष विलास माळी, वाजगाव ग्रामपंचायत लिपिक एस.ए.देवरे, संतोष सोनवणे आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com