'नाएसो'ची विद्यार्थ्यांना अनोखी भेट

'नाएसो'ची विद्यार्थ्यांना अनोखी भेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific approach) वाढीस लागावा या हेतूने नाशिक एज्युकेशन (Education) सोसायटीच्या शाळेसाठी अत्याधुनिक दुर्बिण (Binoculars) भेट देण्यात आली.

हेमेंद्र कोठारी यांनी दिलेल्या देणगीतून संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी ही अत्याधुनिक दुर्बीण संस्थेला प्रजासत्ताक दिनी (Republic Day) भेट दिली.

याप्रसंगी खगोल अभ्यासक (Astronomer) सारंग ओक यांनी विज्ञान व भूगोल विषय शिक्षकांना दुर्बिणीचे वैशिष्ट्ये विशद करून सांगितले व प्रात्यक्षिकातून आकाश निरीक्षणाद्वारे (observation) गुरु ग्रह, गुरुचे उपग्रह यांचे दर्शन घडवून आणले.

शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी या दुर्बिणीचा उपयोग करण्यात येणार असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व भूगोल या विषयाची गोडी निर्माण होणार आहे असा विश्वास प्रा. रहाळकर यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com