ट्रॅक्टरसह कांद्याने भरलेली ट्रॉली लंपास

ट्रॅक्टरसह कांद्याने भरलेली ट्रॉली लंपास

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील दातली येथील शेतकर्‍यांच्या घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरसह (Tractor) कांद्याने (onion) भरलेली ट्रॉली (Trolley) लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.27) रात्री 1 च्या सुमारास घडली.

गावात राहणारे आनंदा गबाजी भाबड यांनी रविवारी (दि.26) सायंकाळी कांद्याने भरलेल्या निळ्या रंगाचा न्यू हॉलंड कंपनीचा (New Holland Company) ट्रॅक्टर (Tractor) क्र. एम. एच. 15/ बी. डब्लू 4113 व ट्रॉली क्र. एम. एच. 15/ सी. एस. 2191 आपल्या घरासमोर आणून उभा केली होती. सोमवारी (दि.27) सकाळी भाबड हे कांदे बाजार समितीत विकण्यासाठी नेणार होते. मात्र, रात्रीच्या वेळी चोरट्याने कांद्याच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर लंपास केला.

भाबड हे रात्री 3 च्या सुमारास लघुशंकेसाठी झोपेतून उठले असता त्यांना ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ घरातील इतर सदस्यांना उठवत ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोध घेऊनही त्यांना ट्रॅक्टर आढळला नाही. मात्र, देवपुर-पंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर ठिकठिकाणी कांदे पडलेले त्यांना दिसून आले. मानमोड्यापर्यंत हे कांदे रस्त्यावर पडलेले दिसून आले. मात्र, पुढील रस्त्यावर कांदे पडलेले दिसत नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला.

पुढे त्यांनी पंचाळे येथे जात रस्त्यावर असलेल्या सर्कलवरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) बघितल्यानंतर रात्री सव्वा दोनच्या सुमारास ट्रॅक्टर कोपरगावच्या (Kopargaon) दिशेने जाताना दिसून आला. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) जात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची फिर्याद (Complaint of theft) दाखल केली आहे. ट्रॅक्टरमध्ये 18 ते 20 क्विंटल कांदे असल्याचे भाबड यांनी सांगितले. ट्रॅक्टर कुणाला आढळून आल्यास एमआयडीसी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी (police) केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com