कुसुमाग्रजांच्या कवितांची साक्ष देणारे झाड

कुसुमाग्रजांच्या कवितांची साक्ष देणारे झाड

शिरवाडे वणी । दिलीप निफाडे | Shirwade Vani

कवितांच्या माध्यमातून पर्यावरण (Environment) मित्र, भाव कवी कुसुमाग्रज (Poet Kusumagraj) तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या चिरंतर आठवणीतील

गावाचा दक्षिण भागात स्मशान (cemetery) व नदीकाठ यांच्या सानिध्यात असलेले एक फणसाचे झाड (banyan tree) शतकाच्या उंबरठ्यावर असून कुसुमाग्रजांच्या कवितेच्या आठवणी या झाडाकडे बघितल्यानंतर जागृत होताना दिसत आहे

म्हणतात ना गावाला लाभलेला इतिहास (History) असो वा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या कर्तृत्वातून निर्माण झालेले वैभव असो ते जपल्यानंतरच त्या इतिहासाच्या अधिकाधिक ठळक व्हायला लागतात. त्याप्रमाणे या फणसाची देखभाल करून जपणूक ग्रामस्थांनी केली आहे. एकेकाळी या फणसाच्या झाडाखाली बसून कविता (Poetry) करणार्‍या भाव कवी कविवर्य कुसुमाग्रज यांनी जगाचा निरोप घेऊन 23 वर्षानंतरच्या कालावधीनंतर देखील आजही या झाडाखाली आल्यानंतर कवितांच्या आठवणी जागृत होताना दिसत आहे.

फणसाच्या झाडाखाली बसून शेजारी काजळी नदीच्या खळाळत्या प्रवाह बरोबर कविता करताना मराठी भाषेचा (Marathi language) प्रवाह बोलण्यातून, लिहिण्यातून तसेच कवितातून व आचार विचारांच्या प्रदानातून एकेकाळी वाहत होता. तो प्रवाह आज जरी आटला असला तरी त्याची छाप मराठी जनमाणसावर पडत आहे. खळाळत्या नदीचा काठ आणि फणसाच्या झाडाला कविता करताना लावलेली पाठ म्हणजे ऐल तटावर पैल तटावर दोन पाखरे नदीकिनारी ही कविता आजही आठवल्यानंतर त्यांच्या आठवणी अभिमानाने उचंबळून येणे स्वाभाविकच आहे.

स्मशानभूमी जवळच फणसाचे झाड असल्यामुळे ‘आठवणींच्या सरणावर एक प्रेत एकट जळत आहे, मरण रोजच असलं तरी जळणं मात्र नव आहे’ या कवितेचा भावार्थ देणे काय वावगे ठरेल. गावामध्ये त्यांचे मोठमोठाले वाडे व वैभव असताना त्यांच्या नावाची ना चिरा ना पणती अशी अवस्था झाली असून कुसुमाग्रजांच्या नावाने छाती बडवून घेत दुकाने मांडणार्‍यांची आता कीव वाटायला लागली आहे. कुसुमाग्रज ज्या झाडाखाली बसून कविता करत होते ते झाड आता आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून शेवटच्या घटका मोजत असून ते आता कुसुमाग्रजांच्या नावाची चिरा पणती उभारण्याची वाट पाहत असावी असे वाटत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com