बागलाणच्या वारकरी संप्रदायात नाराजीचा सूर

बागलाणच्या वारकरी संप्रदायात नाराजीचा सूर

पिंगळवाडे | संदीप गांगुर्डे

त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी सांप्रदायिक मानाचे देवस्थान आहे या देवस्थानाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात प्रसिद्ध आहे. याच अनुषंगाने या देवस्थानाच्या नवीन मंदिराचा व मंदिर परिसराचा अभूतपूर्व व नाविन्यपूर्ण काम वारकरी भाविक व शासनाच्या माध्यमातून सुशोभीकरण व प्राणप्रतिष्ठाचे काम चालू आहे.

या कामात मोलाचा वाटा बागलाण, देवळा, मालेगाव या तालुक्यातून आहे.तसेच निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने जायखेडा येथून सर्वात मोठी पायी दिंडीचे नियोजन केले जाते. या दिंडीत आजही हजारो भावीक सहभागी होतात व ही दिंडी वैकुंठवासी कृष्णाजी माऊली यांनी साधारण 40 वर्ष पूर्वी सुरू केली आहे व आजपर्यंत दिंडी सुरूच आहे तसेच निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे प्राणप्रतिष्ठाच्या कामी या परिसरातील भाविकांनी भरभरून आर्थिक मदत केली आहे.

परंतु आता नव्याने या समाधी मंदिराचे नवीन विश्वस्त मंडळ स्थापन झाले पण मात्र बागलाणच्या कोणत्याही वारकरी मंडळाला स्थान नाही. याबाबत बागलाण मधील वारकरी संप्रदायात तीव्र नाराजीचे सुर उमटत आहेत.यात बागलाण तालुका वारकरी संघटना, ह भ प वै कृष्णाजी माऊली जायखेडकर भक्त परिवार,व नाशिक जिल्हा वारकरी महामंडळ अशा अनेक संघटनेतील भाविकांकडून तीव्र निषेध होत आहे. तसेच याबाबत विश्वस्त मंडळांनी नव्याने विचार करावा व नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकरी यांना समान न्याय द्यावा हीच अपेक्षा वारकरी सांप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.

निवृत्तीनाथ महाराज समाधी यासाठी आम्ही बागलाण वासीयांनी मोलाचे सहकार्य केले आहे. व आमच्याच तालुक्याला किंवा इतरत्र तालुक्याला येथे स्थान नाही. याबाबत आम्ही याचा तीव्र निषेध करत आहोत.

कृष्णा धर्मा भामरे पिंगळवाडे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com