
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
जाधव संकुल परिसरात तीन वर्षीय मुलाच्या अंगावर लाकडी कपाट पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता लाकडी कपाटा जवळ झोपलेल्या तीन वर्षीय शौर्य सुजित विश्वकर्मा याच्या अंगावर अचानक पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरानी त्यास तपासून मृत घोषित केले.
तीन वर्षाच्या बालकाचा करुण अंत झाल्याने परिसरात देखील शोककळा पसरली. या प्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण करीत आहे.