Nashik News : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी खोटी तक्रार; फिर्यादी विरोधात निवेदन

Nashik News : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी  खोटी तक्रार; फिर्यादी विरोधात निवेदन

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade wakad

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) गोंदेगाव (Gondegaon) येथे गावांतर्गत सुरू असलेल्या रस्ता कामाच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंच अनिल रणशूर यांच्याशी चर्चा करत असतांना ज्येष्ठ नागरिक पोपट गंगाधर भोसले यांना मारहाण (Beating) केल्याची तक्रार निलेश भाऊसाहेब भोसले यांच्याविरोधात पोलिसात (Police) दाखल केली होती. पण ही तक्रार खोटी असल्याचे निवेदन निलेश भोसले यांनी लासलगाव स.पो.नि.राहुल वाघ यांना दिले असून त्यात वृत्तपत्रात बदनामी केल्यामुळे पोपट भोसले यांच्यावर कार्यवाही करावी म्हटले आहे...

भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात (Statement) म्हटले आहे की, काल शुक्रवार (दि. १० नोव्हेंबर) रोजी सकाळी गोंदेगांव गांवात महादेव मंदिरासमोर असतांना आमच्या गावच्या सरपंचाशी मी फोनवर बोलत होतो. त्यावेळी आमच्या गावातील इसम पोपट गंगाधर भोसले हा नशेत माझ्यासमोर आला व मला विनाकारण शिवीगाळ करायला लागला. तुम्ही वयस्कर आहात, तुमची स्वतची काळजी घ्या असे सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला मारण्यासाठी जमिनीवरून दगड उचलण्याचा प्रयत्न केला असता ते स्वता:च त्या दगडावर पडले व त्यांच्या हाताला थोडे खरचटले.

Nashik News : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी  खोटी तक्रार; फिर्यादी विरोधात निवेदन
Nashik News : निकृष्ट रस्त्याची सरपंचाकडे तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

मागील घरगुती भांडणाच्या कारणांवरून वाद करून सदरचे इसम यांचे दोन मुले एक प्रशांत भोसले हा दारू पिऊन धमकी देतो व दुसरा मुलगा विकास भोसले याने पण मला धमकी दिली की, तु मागे माझ्यावरती ग्रामपंचायतला अर्ज केला होता त्यामुळे तुला सोडणार नाही. मी पत्रकार आहे, पेपरमध्ये तुझी बातमी देऊन तुझी इज्जत घालवतो म्हणून त्याने माझी बदनामी करून वर्तमान पत्रात मी गांवगुंड आहे अशी बातमी छापून आणली व माझी सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आणून बदनामी केली. सदर इसमाचा मुलगा विकास भोसले हा पत्रकार असून ग्रामपंचायत गोंदेगांव येथे ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो.

गावातील गोरगरीब इसमांकडून ग्रामपंचायत योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवून सरपंच, ग्रामसेवक यांना कुठलीही माहीती न देता त्यांच्याकडून गोठा, घरकुलाचे फोटो व फाईल तयार करून द्यायचे व शौचालयाच्या प्रकरणासाठी पैसे घेतो. पैसे दिले नाही तर मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देणार नाही. मी पत्रकार आहे असे सांगतो व धमक्या देऊन खंडणी घेतो व सर्वसामान्य गरीब लोकांची फसवणूक करतो. याबाबत मी गावचा दक्ष नागरीक म्हणून (दिनांक १५ ऑगस्ट २०२३) रोजी ग्रामसेवक गोंदेगांव ग्रामपंचायत यांच्याकडे या इसमाच्या संदर्भात तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने विनाकारण पोपट गंगाधर भोसले व त्याचा मुलगा तोतया पत्रकार विकास भोसले यांनी माझ्याशी विनाकारण भांडण करून माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद देऊन भांडण काढले आहे. तरी गावातील या तोतया पत्रकार व सर्वसामान्य जनतेची लुट करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई व मला तसेच गावकऱ्यांना न्याय मिळावा असे भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी  खोटी तक्रार; फिर्यादी विरोधात निवेदन
Maharashtra Politics : शरद पवार लवकरच भाजपसोबत जाणार; 'या' आमदाराचा खळबळजनक दावा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com