राष्ट्रवादी युवक काँग्रेस,प्रहार संघटनेचे जि.प. सीईओ यांना निवेदन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस,प्रहार संघटनेचे जि.प. सीईओ यांना निवेदन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग (Zilla Parishad Construction Department)क्रमांक एकच्या वादग्रस्त अभियांत्रकी सहाय्यक गायत्री पवार यांचे पुर्नस्थापना करू नये,अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ( NCP )प्रदेश सचिव ज्येष्ठ अहिरे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

निवेदनात म्हटले आहे,गायत्री पवार या बांधकाम विभाग क्र.२ मध्ये कार्यरत असतांना त्यांनी अनेक प्रकारच्या अनियमितता केलेली आहे. जागेवर न थांबणे, उशिरा येणे, लवकर जाणे, पुर्वपरवानगी न घेता गैरहजर रहाणे, वरिष्ठांशी लोकप्रतिनिधींशी उध्दट बोलने, कंत्राटदाराचे कामे न करणे, कॉट्रक्टर कडुन पैशांची मागणी करणे,अशा प्रकारे गंभिर स्वरुपाच्या तक्रारी होत्या.त्यामुळे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून चौकशी समितीच्या अहवालात तथ्य आढळल्याने त्यांना निलंबित करुन त्यांच्या वर कार्यवाही केली. त्यामुळे शासनाची व जिल्हा परिषद सारख्या मिनी मंत्रालयाचा प्रतिमा ही मलिन झालेली असुन जिल्हा परिषदेकडे बघन्याचा लोकांचा उद्देश हा नकारात्मक झालेला आहे.

अशा कर्मचा-याची या आधीही बांधकाम विभाग-१ मधुन तक्रारी बदली बांधकाम- २ विभागात झाली. परंतु,तेथेही त्यांच्या कामकाजात कुठलीही सुधारणा न होता तक्रारींचा पाढा हा अधिकच वाढतच गेला.आता त्या पुन्हा बांधकाम विभाग क्रमांक१,२, ३ या विभागातील मलाईदार टेबलावर स्थापना देण्याचा घाट रचला जात आहे.या कर्मचा-याची पुर्नस्थापीत करतांना प्रशासकीय इमारतीतील डिपार्टमेंटला न देता इतरत्र ठिकाणी घ्यावे. सदर कर्मचा-यास पुन्हा बांधकाम विभाग १,२ किंवा ३ मध्ये पुर्नस्थापना दिल्यास इतर कर्मचा-यावर गैर परिणाम होवुन जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुजोर होण्यास खतपाणी मिळेल,असेही निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com