विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचे निवेदन

राविकाँची मागणी
विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचे निवेदन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

विद्यापीठ व युजीसीने ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांच्या यंत्रणेमध्ये विद्यार्थ्यांचा होणारा मानसिक छळ थांबवावे.

या मागणीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठा अंतर्गत महाविद्यालयाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या. मात्र या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत असून त्यांचा मानसिक छळ होत आहे.

या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहे. तसेच यापुढेही परीक्षा अशा पध्दतीने सुरु राहिल्यास आणि विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

यावेळी बाजार समिती उपसभापती अनिल देशमुुख, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, युवा नेते गोकूळ झिरवाळ, युवक तालुकाध्यक्ष शामराव हिरे, राविकॉ तालुकाध्यक्ष निलेश गटकळ, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार, राविकॉचे पदाधिकारी रोशन अपसुंदे, किशोर दिघे, मोसिम शेख, रणजित पिंगळे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com