आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्राेत

मिळणार नॅचरोपॅथीचे धडे; शिक्षणाबरोबर विद्यावेतन
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्राेत

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबरच शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालय संलग्न पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलेपमेंटसाठी छोटे कोर्सेस उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामाध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना नॅचरोपॅथीचे धडे मिळणार मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना पुण्यातील आंबेगाव येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध आजारासंबंधी ॲक्युपंचर, नॅचरोपॅथी कुकिंग, फिटनेस ट्रेनिंग, मसाज, योगा टीचर, असे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतले जातात.

राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपले करिअर करण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेच्या माध्यमातून गोहे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील केंद्रात मोफत शिक्षण दिले जाईल.

‘नॅचरोपॅथी’चे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना तीन ते आठ हजार रुपये दरमहा विद्या वेतनदेखील दिले जाणार आहे. शबरी वित्त व विकास महामंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

तर ‘ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग’ या एक वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्राकडून पाच हजार, तर राज्य शासनाकडून तीन हजार असे एकूण आठ हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केले आहे.

असे आहेत कोर्स

कोर्स कालावधी

नॅचरोपॅथी कुकिंग १५ दिवस

फिटनेस ट्रेनिंग १५ दिवस

मसाज टेक्निक ६० दिवस

योगा टीचर ७५ दिवस

ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग ३६५ दिवस

उत्पन्नाचे साधन मिळेल : आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल.

नितीन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com