'या' सौर ऊर्जा कंपनीला दणका; वन आणि महसूल विभागाने केली मोठी कारवाई

'या' सौर ऊर्जा कंपनीला दणका; वन आणि महसूल विभागाने केली मोठी कारवाई

नांदगाव | वार्ताहर | Nandgaon

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी-पांझण (Doctorwadi-Panzan) शिवारातील वनजमिनीवरील टी. पी. सौर ऊर्जा कंपनीच्या (T. P. Solar Energy Company) प्रकल्पाचे अतिक्रमण मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. नाशिकचे विभागीय वनाधिकारी यांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी वनाधिकारी व १५० वनकर्मचाऱ्यांसह २०० पेक्षा पोलिसांचा फौजफाटा घेत डॉक्टरवाडी-पांझण शिवारात धडक दिली.

येथील सुमारे २०० कोटी रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला वारंवार लेखी सुचना देऊनही काम न थांबवणाऱ्या टी. पी. सौर्या यांचे मौजे डॉक्टरवाडी, बाभूळवाडी सोलर प्रकल्पास भेट देऊन सदर प्रकल्प सील बंद करणेत आला .वनजमिनीवर अतिक्रमण करत व्यावसायिक वापर करणाऱ्या खासगी कंपनीला पहिल्यांदाच वनविभागाने अशाप्रकारे 'दणका' दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नांदगाव वनपरिक्षेत्रातील (Nandgaon Forest) डॉक्टरवाडी-पांझण शिवारात असलेल्या वनजमिनीवर टी. पी. सौर्या या कंपनीने सौर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. पांझणला वणी दक्षता पथकाने दोन दिवसांपुर्वी छापा टाकून वन कक्ष क्रमांक ४८९ मधील वनजमिनीवर अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच जेसीबी, ट्रॅक्टरदेखील जप्त केले होते.

तरीदेखील याठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी संपुर्ण प्रकल्प सील करण्याचे आदेश विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना दिले.

'या' सौर ऊर्जा कंपनीला दणका; वन आणि महसूल विभागाने केली मोठी कारवाई
मंत्रालय परिसरात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

माळी यांनी याप्रकरणी नियोजन करत मंगळवारी सकाळी नांदगाव, चांदवड, येवला वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कर्मचाऱ्यांसह नाशिक, वणी, अहमदनगरचे वन फिरते पथकांची (दक्षता पथक) अतिरिक्त कुमक व १५० ग्रामिण पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी दहा वाजता धडक दिली.

यावेळी तातडीने सर्व प्रकल्प जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर प्रकल्पाचे सर्व साहित्य जप्त करून सील (Seal) करणेत आले. पुढील आदेश होईपावेतो प्रकल्प बंद ठेवणेकामी कंपनीकडून लेखी हमी पत्र घेण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक मनमाड सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड संजय वाघमारे, दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार, राहूल घरटे व रविंद्र भोगे तसेच मनमाड उपविभागातील व दक्षता पथकाचे वनपाल, वरक्षक व वनमजूर असे एकूण १०० च्या वर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. तसेच निवासी नायब तहसिलदार नांदगाव चेतन कोनकर व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com