खड्ड्यांमुळे 'या' महामार्गावर अपघातांची मालिका

खड्ड्यांमुळे 'या' महामार्गावर अपघातांची मालिका

मनमाड । प्रतिनिधी Manmad

खड्ड्यांमुळे (potholes) मनमाड (manmad) शहरातून जाणार्‍या पुणे-इंदौर (Pune-Indore), नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) या मार्गावर अपघातांची मालिका (series of accidents) थांबण्याची चिन्हे दिसत नाही.

पानेवाडीजवळ कार आणि ट्रॅक्टरच्या (Tractor) भिषण अपघातात (accident) पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज बुधवार स्मशानभूमीलगत असलेल्या पुलावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने स्कुटीला जबर धडक दिल्यामुळे स्कुटीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

खड्डा चुकवितांना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघाता नंतर चालक ट्रक घेऊन पसार झाला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संभाजीनगर येवला (yeola) येथील तुकाराम सुकदेव खैरनार (वय 64) हे गिरणारे (girnare) येथे शेती असल्याने एमएच-12,एनएल-764 या स्कुटी वरुन येवल्याहून गिरणारेकडे जात होते.

मनमाडलगत स्मशानभूमी जवळ असलेल्या पुलावर आरजे-50,जीबी-2527 या ट्रकने स्कुटीला जबर धडक दिल्याने या अपघतात खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाता नंतर चालक ट्रक घेऊन फरार झाला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला जळगाव चोंडी जवळ पकडले या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड-नांदगाव मार्गावर (Manmad-Nandgaon road) एनेव्हा कार आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन या अपघतात कार मधील चार तर ट्रॅक्टरवरील एक असे 5 जण गंभीर जखमी झाले.अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भागाचा पुर्णत: चक्काचूर झाला तर ट्रॅक्टर खड्ड्यात फेकला गेला होता. हा अपघात देखील खड्डा चुकविण्याच्या नादात झाला आहे.

मनमाड शहरातून जाणार्‍या पुणे-इंदौर महामार्गाची (Pune-Indore Highway) खड्ड्यामुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी इतके खड्डे पडलेले आहे कि महामार्गावर चालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. हीच परिस्थिती नाशिक (nashik) औरंगाबाद (Aurangabad) या मार्गाची झालेली आहे. मनमाड ते नांदगाव 24 किमी मार्गाची अक्षरश चाळण झाली असून खड्डे चुकविण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून त्यात काहींचा बळी गेला तर अनेक जण जखमी देखील झालेले आहे.

सुमारे तीन वर्षा पूर्वी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे रस्ता खराब झाल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे मात्र साध्य हा मार्ग खड्डेमय झालेला असताना देखील ठेकदार (Contractor) खड्डे बुजवत नाही ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्ती करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (Public Works Department) असताना अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप वाहन चालकाकडून केला जात आहे.

ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची त्याला मिळत असलेली साथ त्याचा फटका हा वाहन धारकांना तर बसत आहे. त्यामुळे आणखी किती बळी घेतल्यावर रस्त्यांची दुरस्ती केली जाईल असा संतप्त सवाल वाहन चालका सोबत नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com